मालेगाव : शाळेत ५ वर्षांच्या मुलीवर शिपायानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजात संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड करण्यात आली. शाळाप्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गोंधळ उडळा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावच्या आयेशा नगर भागातील मदर आयेशा शाळेत शिकणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीवर शाळेच्या सफाई कामगाराने दोन दिवसांपूर्वी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या मुलीच्या नातलगांना शाळा प्रशासनानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याने संतप्त झालेल्या जमावाने शाळेच्या फर्निचरची तोडफोड करत, बेंच पेटवून दिले. जमाव वाढत गेला,
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. 


जमावानं पोलिसांवरही दगडफेक केली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या, तर पोलिसांच्या तीन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. मिडीयाला छायाचित्रण करण्यास जमावानं मज्जाव केला, तसेच मोबाईलवर व्हीडीओ काढणा-यांचे मोबाईलही फोडून टाकण्यात आले. वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी आयशा नगरमध्ये अजूनही  तणावाचं वातावरण आहे.